दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघ (डी.डी.सी.ए.) ने छोट्या कार्यक्रमात फिरोजशहा कोटला मैदानाच्या गेट नंबर 2 चे नाव माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग गेट असे ठेवले आहे. ह्या प्रसंगी वीरेंद्र ससेहवाग म्हणाला कि मी आज खूप आनंदी आहे कि माझ्या नावाने ह्या गेट चे नाव ठेवण्यात आले.गेट, ड्रेसिंग रूम अश्या ठिकाणांना जेथे अनेक खेळाडू खेळलेले असतात तिथे त्यांचे नाव दिले जाणे हि चांगली सुरवात आहे, ह्याने अनेक नव्या खेळाडूंना चांगले प्रदर्शन करण्याची प्रेरणा मिळेल.मी स्थानिक क्रिकेट मध्ये अधिक काळ दिल्ली संघाकडूनच खेळलो परंतु मला हि खंत नेहमीच असेल कि मी दिल्लीच्या रणजी करंडक विजेता संघाचा भाग होवू शकलो नाही. परंतु आजचा हा क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, आज ह्या ठिकाणी मी माझी आई आणि पत्नीची उणीव मला जाणवत आहे. आईची तब्बेत बरी नसल्यामुळे त्या दोघी येवू शकल्या नाहीत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews