बिना भाड्याच्या खोलीत रवानगी झालेल्या बाबा राम रहीम यांना "मोफत ते पोषक" लाभतातना दिसत नाही. ऐश्वर्य पायाशी लोळण घेत असताना, जेल मध्ये रवानगी आणि तेथील राहणीमान न पचणार ठरलं. जेल मध्ये जाण्यापूर्वी बाबाचं वजन ९० कि. होतं. आता ते ८४ किलो असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे.
बाबा राम रहीमला नियतीने ही सोडलेलं नाही. त्याला मधुमेह, रक्तदाब आणि पित्ताचा सुद्धा त्रास आहे. जेल मध्ये त्याचे डोस सुरू आहेत. मात्र वजन कमी झाल्याने डोस ही कमी करण्यात आले आहे. आपल्या नंतर डेर्याच नेतृत्व कोण करणार ? याची सुध्दा काळजी लागून आहे. स्वतःच्या चित्रपटात बाबा अनेक प्रयत्न करून देखील वजन कमी होत नाही असे दाखवले होते, इथे त्यांच्या शिक्षेप्रमाणे त्यांना ४ तास रोज शेतीची कामे करावी लागत आहेत. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळत असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.