नाशिक : शहरात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून मंगळवार वगळता पावसाचा जोर आजपर्यंत कायम आहे. आज दुपारी पावणेतीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली असून महापालिकेचे मुख्यालय असलेल्या शरणपुररोडवरील राजीव गांधी भवन मुख्यालयाला पाण्याचा वेढा पडला. पालिकेच्या द्वारावर पावसाच्या पाण्याचे तळे साचले आहे. (व्हिडीओ - प्रशांत खरोटे)