"मित्रो" आता मोदी व्हॉइस ओव्हर ही करणार मोदी | नरेंद्र मोदीच्या बद्दल नविन बातमी 2017

Lokmat 2021-09-13

Views 0

"मित्रो" आता मोदी व्हॉइस ओव्हर ही करणार मोदी !

मुलगी वाचवा मुलगी शिकवा ही मोहीम पूर्ण भारतभर राबविण्यात येत आहे. याकामात वृद्धी व्हावी म्हणून अनेक नाटके, लघुपट तयार होत असतात. आता लवकरच या मोहिमेवर आधारित चित्रपट तयार होणार आहे. सध्या तरी या चित्रपटाचे शिर्षक ABC असं ठेवण्यात आलं आहे. या चित्रपटासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आवाज (व्हॉइस ओव्हर) देणार आहेत. या चित्रपटाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस संगीत देणार आहेत. तर राजकुमार शेंडगे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, श्री श्री रविशंकर, सुनील शेट्टी, चरंजीवी व किरण बेदी पाहुणे कलाकार म्हणून दिसतील. ऑस्कर नामांकित चित्रपट 'लॉयन' चित्रपटात दिलेला बालकलाकार सनी पवार या चित्रपटात दिसणारं आहेत. हा चित्रपट देशातील १४ भाषांमध्ये डब होणार असून सगळ्या शाळांमध्ये दाखवण्यात येईल, तसेच जर्मन आणि फ़्रेंच मधील चित्रपट महोत्सवात देखील पाठवण्यात येणार आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS