सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार कंगना राणावत राजकारण येण्याच्या दृष्टीनेही विचार करत आहे. चर्चा आहे की, कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनेकदा भेट घेतली आहे. दोन वर्षांआधी स्वच्छता अभियानासाठी एक व्हिडिओ तयार करण्यात आला होता. यात कंगना माता लक्ष्मी बनून साफ-सफाई बाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करताना दिसली होती. या व्हिडिओच्या निमित्तानेच कंगना पहिल्यांदाच पंतप्रधानांना भेटली होती.सध्या सुरू असलेल्या चर्चांनुसार कंगना राणावत हिमाचल प्रदेशातून राजकारणात उतरू शकते. कंगना हिमाचल प्रदेश मधील मंडीमध्ये ती राहणारी आहे. सूत्रांनी सांगितले की, कंगना आजकाल राजकीय कामकाजाच्या पद्धती आणि वातावरण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हेच कारण आहे की, कंगनाने गेल्या काही वर्षात सिनेमा निवडताना खूप काळजी घेतली आहे. आपली प्रतिमा चांगली रहावी यासाठी ती प्रयत्नशील आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews