अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे 11 सप्टेंबर 2017 पासून बेमुदत अंगणवाडी बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून शुक्रवारी (22 सप्टेंबर) कोल्हापुरात जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविकांनी धडक मोर्चा काढला होता.