अहमदनगर, दि. 13 - विविध खेड्यांमधून नगरमध्ये शिक्षणासाठी दाखल झालेल्या तरुणांनी एकत्र येत माईक एकांकिका बसवली अन् पुण्यातील प्रतिष्ठेची पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धा गाजविली. या तरुणांनी तब्बल ३५ वर्षानंतर पुरुषोत्तम करंडकावर नगरचे नाव कोरले़ अशा या माईक एकांकिकेच्या टीमचा ‘लोकमत’ने बुधवारी गौरव केला. यावेळी माईक एकांकिकेच्या लिखाणापासून पुरुषोत्तम करंडक पटकावण्यापर्यंतचा प्रवास या टीमने उलगडला.