नाशिक - बाळासाहेब ठाकरे म्हटले की धगधगती ज्वाला, अंगारच, त्यामुळेच ठाकरे यांचे स्मारक शस्त्राशी जोडणे योग्यच अशा भावना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केल्या होत्या. त्यामुळेच नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे शस्त्रसंग्रहालय साकारले आहे. नाशिक शहरातील जुन्या गंगापूररोडवर असलेल्या पंपींग स्टेशनच्या जागेत हे संग्रहालय नाशिक महापालिका आणि जीव्हीके कंपनीच्या मदतीने हे शस्त्रसंग्रहालय साकारले असून जानेवारी महिन्यात त्याचे उदघाटन करण्यात आले आहे.