विरोधकांच्या संघर्षयात्रेचा सोमवारी सहावा दिवस होता. यावेळी ही यात्रा पंढरपुरात पोहोचली होती. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहीत अन्य नेत्यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतलं. सरकारला शेतक-यांचं कर्जमाफ करण्याची बुद्धी दे, असे साकडं यावेळी घातल्याचं अजित पवारांनी सांगितलं.