Khadse : एकनाथ खडसेंसह कुटुंबियांवर ईडीकडून आरोपपत्र दाखल, खडसेंच्या अडचणी वाढणार |Sakal Media|

Sakal 2021-09-04

Views 1.6K

पुणे भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीनं एकनाथ खडसे आणि कुटुंबियांविरोधात 1 हजार पानी आरोपपत्र दाखल केलंय. आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावांचा समावेश आहे. या जमीन घोटाळ्यात खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीने अटक केलीय. एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी इथं एमआयडीसीतील 3.1 एकर प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये करण्यात आला होता. 31 कोटींची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करण्यात आला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. या प्रकरणात मनीलाँड्रींग झाल्याचा संशय ईडीला असून तपास सुरू आहे.. दरम्यान गिरीश चौधरींचा जामीन अर्जही मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळलाय. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
#eknathkhadse #case #bhosari #pune #maharashtra #marathinews #sakal #sakalnews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS