जलाशयात बुडणाऱ्या व्यक्तीचा सरपंचांनी वाचवला जीव
केळघर (सातारा)(Satara) : मेढा येथील कण्हेर जलाशयात बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव पिंपरीचे सरपंच शांताराम वांगडे यांनी आज वाचवून त्या व्यक्तीला जीवदान दिले आहे. स्वतः चा जीव धोक्यात घालून बुडणाऱ्याचे प्राण वाचवणाऱ्या शांताराम वांगडे यांच्या या धैर्याचे कौतुक होत आहे. वांगडे यांनी दाखवलेल्या या धैर्याबद्दल आज मेढा येथे एका कार्यक्रमात उपविभाग पोलीस अधिकारी शीतल खराडे-जानवे, तहसीलदार राजेंद्र पोळ, सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या हस्ते श्री. वांगडे यांचा सत्कार करण्यात आला. (व्हिडिओ : संदीप गाडवे)
#Satara #Kelghar #Sarpanch #Medha