Kolhapur : दत्त मंदिरात अभिषेक घालून राजू शेट्टींची जलसमाधी परिक्रमेला सुरुवात
Kolhapur : पूरग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हजारो कार्यकर्त्यांसह माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) नृसिंहवाडी येथे जलसमाधी घेणार आहेत. तत्पूर्वी प्रयाग चिखली तालुका करवीर येथे त्यांनी दत्त मंदिरात दत्ताला अभिषेक घातला. त्यानंतर ते नृसिंहवाडी येथे जाणार आहेत. शेकडो कार्यकर्त्यांनी चिखली येथे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी हजेरी लावली आहे. ही जलसमाधी परिक्रमा प्रयाग चिखलीतून सुरु होऊन रविवारी 5 सप्टेंबरला नृसिंहवाडी येथे या परिक्रमेची सांगता होईल. त्यानंतर हजारो कार्यकर्त्यांसह जलसमाधी घेण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
बातमीदार : सुनील पाटील
व्हिडिओ- बी.डी.चेचर
#RajuShetti #kolhapur