Shahada (Nandurbar) : शहादा तालुक्यात जोरदार पाऊस माहामार्गावर वाहतुक ठप्प
Shahada (Nandurbar) : तालुक्यात (ता.३१) सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. त्यात अंकलेश्वर बऱ्हाणपूर मार्गावरील शहादा (Shahada) ते शिरपूर (Shirpur) रस्त्यावर फेस फाटा (ता. शहादा) येथे फरशी पुलावरुन पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. परंतु फेस येथील सरदार वल्लभभाई पटेल युवा फाउंडेशनचा युवकांनी रात्रीच शहादा- शिरपूर या मुख्य रस्त्यावर वाहून आलेली काटेरी झाडे झुडपे रस्त्यातून एका बाजूला करून हायवे वरील ट्रॅफिक सुरळीत करण्यात आली. पाण्याच्या दाब जास्त असल्याने कामात थोड्या अडचणी आल्या परंतु काही काळानंतर वाहतूक सुरळीत केली.
व्हिडीओ - कमलेश पटेल, शहादा
#Shahada #Shirpur #Nandurbar