बीड जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलीय... यामुळे जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झालेत... तर नदी-नाले, ओढे देखील दुथडी भरून वाहू लागलेत... जिल्ह्यातील मणकर्णिका, मांजरा, कुंडलिका, सिंदफणासह अनेक नद्यांना पूर आलाय... तर दुसरीकडे शेतातील उभ्या पिकांमध्ये पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झालंय.. त्याचबरोबर वादळी वाऱ्यामुळे ऊस, मका, कापूस ही पिकं देखील आडवी झालीत... बीड जिल्ह्यात सर्वत्र मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली... जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणी साठा उपलब्ध होणार आहे. मात्र काढणीला आलेल्या सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांना फटका बसलाय.
#beed #beedheavyrainfall #beedrainfall #beeddistrict