Khatav (Satara) : खटावच्या वीरजवानाला अखेरचा सलाम; लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
Khatav (Satara) : वीर जवान अजिंक्य किसन राऊत यांच्यावर रात्री उशिरा येथील स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजिंक्य यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. यावेळी ‘हुतात्मा जवान अजिंक्य राऊत अमर रहे’च्या घोषणा व साश्रुनयनांनी या वीरपुत्राला जवानांनी अखेरची मानवंदना दिली. यावेळी अनेकांच्या अश्रुंचा बांध फुटला होता. वीरपुत्राला अखेरचा निरोप देताना वातावरण सुन्न झाले होते. अंत्यविधीच्या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.
व्हिडिओ : राजेंद्र शिंदे
#Khatav #satara