अकोला ः जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूने रक्ताच्या नात्यात सुद्धा दुरावा निर्माण केला आहे. कोरोना महामारीच्या या काळात पित्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नकार देण्याची दुर्दैवी घटना अकोल्यात घडली. परंतु या संकटाच्या काळात मुस्लिम युवकांनी रमजान ईदच्या पूर्वसंध्येला माणुसकीचा परिचय देत महापालिकेच्या सूचनेवरुन वृद्धाच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली. त्यामुळे अकोल्यात ‘हिंदू-मुस्लिम भाई-भाई’चा नवा अध्याय रचला गेला.
#coronavirus #covid10 #akola #hospital #death #hindu #muslim #relation #sakal #viral