मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही ती यश मिळवताना दिसतेय. नुकताच तिचा बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननसोबत ‘मिमी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. याशिवाय काही दिवसांपूर्वी ‘समांचर २’ या वेबसीरिजमधील भूमिकेचेही बरीच प्रशंसा करण्यात आली होती. आता सई मात्र वेगळ्या कारणाने सोशल मिडियावर चर्चेत आहे. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर तामिळ भाषेत कॅप्शन लिहित एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करण्यामागे एक खास कारणही आहे. सई लवकरच एका तामिळ भाषिक वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नवरसा’ असे या वेबसीरिजचे नाव आहे. या वेबसीरिजच्या संदर्भात साऊथ स्टार विजय सेतूपती यांच्यासोबत एक फोटो पोस्ट करत तिने तामिळमध्ये कॅप्शन देखील लिहिले आहे. “ …………” असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आलाय. विशेष म्हणजे ज्येष्ठ चित्रपट निर्माते मणिरत्नम यांनी या वेबसीरिजची निर्मिती केली आहे.
Chitralivo
#SaiTamhankar #mimi #Samanta2 #Tamilpost #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber