Parner: लंके अन् देवरेंनी न भांडता समन्वयाने कामे करावीत..| Nilesh Lanke | jyoti deore | Sakal Media
पारनेर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची आँडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यावर राज्य राजपत्रीत अधिकारी महासंघाचे संस्थापक तथा प्रमुख सल्लागार ग. दि. कुलथे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''नीलेश लंके हे चांगले काम करणारे आमदार आहेत. तर तहसीलदार ज्योती देवरे या सुध्दा उत्तर काम करणाऱ्या अधिकारी आहेत. त्यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप झाले, पण तसे काहीही नाही. लंके- देवरे यांनी न भांडता समन्वयाने कामे करावीत. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी न भांडता समन्वय ठेवून जनतेची कामे करावीत. त्यामुळे कामे चांगल्या प्रकारे मार्गी लावतील,'' असे कुलथे म्हणाले.
#Parner #jyotideore #tahsildar #NileshLanke #Maharashtra