Dayabenची मालिकेत पुन्हा वापसी? Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 2

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्माने नुकतेच ३००० भाग पूर्ण केले. ही मालिका कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करते आहे. या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत अभिनेत्री दिशा वकानीनेदेखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे ती म्हणजे दयाबेनची. या शोमुळे दिशा घराघरात लोकप्रिय झाली. गेल्या काही वर्षांपासून दिशा वकानी मालिकेतून गायब आहे. तिच्या कमबॅकची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आता सूत्रांकडून समजते आहे की दिशा वकानी मालिकेत पुनरागमन करणार आहे. एकवृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार , दयाबेन म्हणजेच दिशा वकानी नवरात्री किंवा दिवाळीच्या आधी कमबॅक करणार आहे. कारण दयाबेनच्या पात्राला गरबा खेळायला आवडते अशात नवरात्रीमध्ये पुन्हा तिची एन्ट्री करणे योग्य ठरेल. याशिवाय अशीदेखील चर्चा आहे की जर दिशा वकानी मालिकेत परतली नाही तर दयाबेनच्या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड केली जाऊ शकते. निर्मात्याना या मालिकेतील आवडते पात्र दयाबेनला चाहत्यांपासून लांब ठेवायचे नाही.
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy #Dayaben #TaarakMehtaKaOoltahChashmah #DishaVakani
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS