सातारा : मी कोणाच्या आव्हानाला भीक घालत नाही. पण, मी ९६ कुळी मराठा असून मराठा समाजाशी कधीही भावनिक राजकारण केलेले नाही. मराठा तरूण आंदोलनाच्यावेळी ज्या ज्यावेळी अडचणीत आला. त्यावेळी मी पुढाकार घेऊन त्यांना मदत केली आहे. साताऱ्यातील त्या मुलांच्या कुटुंबियांची समजूत काढण्यासाठी तेथे गेलेलो होतो. त्यांना कोणतीही दमबाजी केलेली नाही. ही मुले कोणत्या राजकिय पक्षाशी संबंधित असली तरी ती मराठा आहेत. त्यामुळे त्यांच्या केसालाही धक्का लागला तर त्यांचे संरक्षण करायला शशिकांत शिंदे समर्थ आहे, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी नरेंद्र पाटलांच्या टीकेवर दिले आहे.
#Shashikantshinde #Marathareservation #Satara #Maharashtra #NCP
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics