फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याच्या विरोधात इंटरपोलने बजावलेल्या रेड कॉर्नर नोटीसनुसार त्याचे डोमनिकामधून भारतात कोणत्याही क्षणी प्रत्यार्पण होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) माजी संचालक ए.पी.सिंह यांनी दिली. डोमनिकामध्ये चोक्सीला कोणतेही कायदेशीर अधिकार नाहीत. परंतु, त्याचे अपहरण करुन जबरदस्तीने त्याला डोमनिकामध्ये नेल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्यास त्याचे अँटिग्वामध्ये प्रत्यार्पण होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
#APSingh #FormerDirector #CBI #MehulChoksi #NiravModi #PNB #Dominicancourt
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics