आमच्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या सर्वात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे धानाचे पीक आहे आणि हे धान सरकारने विकत घ्यावे आणि शेतकऱ्यांना त्याचे पैसै द्यावे, येवढा साधा हा विषय आहे. पण जेव्हापासून राज्यात तिघाडी सरकार आले, तेव्हापासून जिल्ह्यांतील धान खरेदी केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला आहे. १ मे रोजी सर्व धान खरेदी केंद्र सुरू व्हायला पाहिजे, पण आज २४ मे तारीख येऊनही एकही धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. पुढील महिन्यात पावसाला सुरुवात होऊ शकते. तरीसुद्धा एकही क्विंटल धान अद्याप खरेदी करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्यापाऱ्याला धान विकण्यासाठी शेतकरी हतबल होत आहेत. म्हणून आम्ही आज ह आंदोलन केले, असे खासदार सुनील मेंढे म्हणाले
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics