नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत पण ते विनोद करतात हे मला माहिती नव्हते. त्यांच़े कालचे वक्तव्य हा राजकारणातील विनोद आहे, या पेक्षा त्याला जास्त महत्व देण्याच कारण नाही, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज नारायण राणे यांच्या वक्तव्याला आपण फार महत्व देत नाही हेच दाखवून दिले.