शेंडी (ता. अकोले, जि. नगर) ः शेंडी येथे यशवंतराव भांगरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच राष्ट्रवादीतील सहकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. ते म्हणाले ""मी 1980 मध्ये 56 आमदारांचा विरोधी पक्षनेता होतो. कामानिमित्त इंग्लडला गेलो, तर इकडे 50 आमदार फुटले. सोबत फक्त 6 आमदार राहिले, मात्र मी स्थिर होतो. सोडून गेलेल्या 50 पैकी 48 आमदार पराभूत झाले. मधुकर पिचड यांनाही मंत्री, पक्षाचा प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेता केले, मात्र ते मला सोडून गेले व पराभूत झाले. येथील पहिल्या परिवर्तन सभेतच लोकांच्या मनात काय चालले, ते मला समजले होते.''