शुक्रवारी शरद पवार पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरामध्ये पोहोचले. यावेळी मंदिराच्या विश्वस्तांनी पवारांचं स्वागत केलं. मात्र शरद पवारांनी मंदिरामध्ये प्रवेश केला नाही. शरद पवार नास्तिक असल्याची टीका राज ठाकरेंनी केली होती. त्यातच पवार दगडूशेठ मंदिरात न गेल्याने चर्चांना उधाण आलं होतं. या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया देत पवार मंदिरात का गेले नाहीत? यामागचं कारण सांगितलं.
#SharadPawar #DagdushethHalwaiGanpatiMandir #AjitPawar #Pune