पुणे : विधान परिषदेच्या लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव निश्चित केला. लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली. देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली. शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास लाड यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला