देशाचे नेते शरद पवार यांना ईडीची नोटीस आली होती, राज ठाकरे यांना ही ईडीची नोटीस आली होती. प्रताप सरनाईक हे धिरोदत्तपणे ईडीच्या चौकशीला समोर जातील, असे प्रतिपादन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सोलापूर येथे केले. मराठी माणसाबद्दल संजय राऊतांनी आम्हाला सांगू नये कारण राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊतांनी भूमिका घेतली नव्हती, असाही टोला नांदगावकर यांनी लगावला