मुंबई : देवेंद्र फडणवीस यांना कोणताही मुद्दा राहिला नाही म्हणून ते मुख्यमंत्र्याविषयी विधाने करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत असे शब्द वापरणे चूक आहे. मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला आहे? उलट प्रत्येक वेळी संकटाचा सामना करताना मुख्यमंत्र्यांनी समजूतदारपणा दाखवला आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना सुनावले आहे.