कोरोनामुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांच्या दुधाला दरवाढ न मिळाल्याने त्याचे नुकसान होत आहे. राज्य सरकारने गायीच्या प्रतिलिटर दुधाला दहा रुपये अनुदान आणि प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा, या मागणीकरीता भाजपतर्फै राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातही आंदोलन करण्यात आल. यावेळी माजी मंञी बाळा भेगडे, योगेश गोगावले आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शेतीमधील उद्धव ठाकरे यांना समजत नसलं तरी अजित पवार यांना समजते. त्यांनी तरी लक्ष घालावे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews #Ajit Pawar #Chandrakant Patil