#sarkarnama #Bulletin #Maharastra
सरकारनामा बुलेटिन | राजकीय घडामोडी | महाराष्ट्र | पॅालिटिक्स | राजकारण
अकोला : विदर्भ, मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बियाणे उगवले नसल्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. हजारो तक्रारी शेतकऱ्यांच्या प्राप्त झाल्याने युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी युवक कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव यांच्या नेतृत्वात महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी यांना गुरुवारी दुपारी घेराव घालून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. नापिकी, कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे टाळेबंदीने शेतकऱ्यांपुढे आर्थिक पेच निर्माण केला आहे. त्यात यावर्षी बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना आणखी संकटात ढकले आहे. सोयाबीनचे राज्यातील सरासरी क्षेत्र 40 लाख हेक्टर आहे. त्यापैकी 20 टक्के क्षेत्रावरील बियाणे उगवलेच नाही. विदर्भातील 10 हजार तर मराठवाड्यातील 45 हजार शेतकऱ्यांनी यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत.