राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात असताना या ताफ्यातील पोलीसांची पायलट जीप मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाच्या खाली आज सकाळी उलटली. यामध्ये एकाला किरकोळ मार लागल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
एक्स्प्रेस वे वरुन पवार यांच्या वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेन जात होता. त्यावेळी पायलट कार अमृतांजन पुलाच्या खाली उलटली. पवार यांची गाडी सुखरुपपणे पुढे गेली. आज सकाळी खोपोली शहराच्या परिसरात एक्स्प्रेस वे वर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. त्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे वाहनाची कोंडी झाली होती. ही कोंडी सुटत असतानाच पवार यांच्या ताफ्यातील पोलिस कार उलटली. एक्स्प्रेसवे वरील देवदूत पथकाने व महामार्ग पोलिसांनी तात्काळ या जीपचा चालक व जखमी पोलिसावर उपचार केले.
#Sarkarnama #Sharadpawar #PuneMumbaiExpressway #Trending