राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाल्याचा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी केला होता. राणे यांच्या ट्विटनंतर गुप्त बैठक नेमकी कशा संदर्भात झाली आणि उदय सामंत आणि फडणवीस यांच्यात काय खलबतं झाली, अशी चर्चा सुरू झाली. त्यावरून वेगवेगळ्या चर्चाही सुरू झाल्या. अखेर या सगळ्या प्रकरणावर उदय सामंत यांनी मौन सोडलं.
#UdaySamant #Shivsena #DevendraFadnavis #BJP