आमदार विनायक मेटे यांनी ५ जूनपासून मराठा समाजाच्या एल्गार मोर्च्याची सुरवात होणार असल्याची घोषणा केली आहे. बीडमधून एल्गार मोर्च्याची सुरुवात होणार आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर १६ तारखेला मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढणार होतो.मात्र या सरकारने मराठ्यांचा असंतोष दिसू नये, मराठ्यांनी आंदोलन करू नये, रस्त्यावर उतरू नये म्हणून लॉकडाऊन वाढवला असल्याचं विनायक मेटे यांचं म्हणणं आहे.
#MarathaReservation