राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणी सुप्रिम कोर्टात सुणावणी सुरू आहे. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी नोव्हेंबर २०१९ रोजी शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीतील ठरावाचं एक पत्र आपल्या युक्तिवादासोबत जोडलं होतं. मात्र हे पत्र मराठीत असल्यामुळे त्याचं भाषांतरही जोडलं जावं असं न्यायाधीशांनी सांगितले. त्यानंतर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी यामध्ये हस्तक्षेप करत मराठीतील हे पत्र वाचलं. शिवसेना कार्यकारणीच्या ठरावाच्या बैठकीत काय निर्णय झाले, याची माहिती त्यांनी दिली. सध्या सरन्यायाधीशांचा मराठीतील हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.