पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) बसेस बंद करण्यास आमचा विरोध आहे. संचारबंदीऐवजी जमावबंदीची अंमलबजावणी करावी. संचारबंदी करावयाची असल्यास ती रात्री आठ वाजल्यानंतर लागू करावी, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
कंपनीत किंवा कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना येण्या-जाण्यासाठी पीएमपीएल बसेस सुरू ठेवाव्यात. उद्योगधंद्यात काम करणारे कर्मचारी नाही आल्यास उद्योगधंदे बंद पडतील. सरकार रेशन देत नाही आणि मानधनही देत नाही. दररोज रोजगारावर जाणाऱ्या कामगारांची चुल कशी पेटणार? त्यांच्या रोजगाराची आणि जीवनाची काळजी सरकारने घेण्याची गरज आहे.
#pune #girishbapat #lockdown #Maharashtra
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.