येरवडा 'तुरुंग' न राहता संस्कार केंद्र' बनवू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | Pune | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 468

पुणे : येरवडा कारागृहाचा इतिहास सर्वसामान्य लोकांना, विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना कळावा म्हणून येत्या 26 जानेवारीला पुण्यातील येरवडा तुरुंगात 'जेल पर्यटन' सुरु करत असल्याची घोषणा महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. आज या जेल पर्यटनाचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरंन्सिगच्या माध्यमातून केले. पुढे ते म्हणाले की, येरवडा तुरुंगात असे काही उपक्रम राबवू ज्यामुळे येरवडा 'तुरुंग' न राहता ते 'संस्कार केंद्र' बनेल. सरकारकडून असे अभिनव उपक्रम राबवू, कि थोड्या दिवसांनी बाहेर पडणाऱ्या कैद्यांना संस्कारक्षम बनवता येईल. आणि येरवड्यातून बाहेर पडणे म्हणजे संस्कार केंद्रातून आलो असं वाटायला हवं असे जरुर प्रयोग करु, असंही त्यांनी म्हटलं
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS