शेतकऱ्याच्या रागात गेला वाघिणीसह तीन छाव्यांचा जीव. | Nagpur | Maharashtra | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 114

उमरेड (जि. नागपूर) : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याच्या हद्दीत वन्यजीव परिक्षेत्रात समाविष्ट कक्ष क्रमांक-१४१५ भागात शेतकऱ्याच्या गाईची शिकार वाघाने केली. शेतकऱ्याने रागाच्या भरात गाईच्या मृतदेहावर ब्युटोक्स नावाचे कीटकनाशक पसरविले. यानंतर टी-४ नावाच्या चार वर्षे वयाच्या वाघिणीसह दोन छावांचा मास भक्षण केल्यामुळे मृत्यू झाला. ही घटना वर्षाच्या पहिल्या दिवशी उघडकीस आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या तपासानंतर नवेगाव साधू या गावातील रहिवासी दिवाकर दत्तुजी नागेकर (४८) या शेतकऱ्याने सारा प्रकार केल्याचे उघडकीस आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यास अटक केली. तसेच उत्तरीय तपासणीनंतर वाघिणीच्या तिसऱ्या पिल्लाचे सुद्धा मृतदेह गवसले. आरोपीस वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून वनकोठडीस रवानगी करण्यात आली. (व्हीडिओ - सतीश तुळसकर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS