शिरूर तालुक्यात दहशत पसरविणारा बिबट्या जेरबंद | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 545

शिरूर तालुक्यात दहशत पसरविणारा बिबट्या जेरबंद

टाकळी हाजी : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्याची दहशत कायम असून वारंवार पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले आहे. गेली पंधरा दिवस पिंजरा लावल्यावर कवठे येमाई (ता. शिरूर) ढाकीवस्ती येथे बिबट्या जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे.


''बिबट्यांचा वावर असल्याने वेगवेगळ्या परिसरात पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा'' अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. या परिसरात डिंभा उजव्या कालव्याच्या यांच्या पाणी व्यवस्थापनामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले. त्यातून या परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली गेली. दिवसा ही बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पाळीव प्राण्यांवरील हल्ले हा दररोजचा विषय बनला होता.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS