उमरगा, ( जि. उस्मानाबाद) : ट्रक व्यवसायात स्वतः चालक, मालक म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून काम करणारी योगिता रघुवंशी यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मूळ रहाणारी नंदूरबारची, सध्या भोपाळमध्ये वास्तव्यास असणारी योगिता बुधवारी (ता. चार) उमरगा येथून भाड्याने माल घेऊन जाण्यासाठी आली होती. त्या वेळी तिने आपल्या जीवनपटाचा उलगडा केला. ट्रक व्यवसायाची स्थिती, महिलांनी विविध क्षेत्रात कार्य करण्याचा संदेश योगिताने दिला. या संदर्भात सकाळचे उमरगा तालुका बातमीदार अविनाश काळे यांनी घेतलेली मुलाखत.
#Umarga #osmanabad #women #truck #driver