गोंडपिपरी तालुक्यातील वर्धा नदीचा पात्रात अनेक प्रजातीचा मासोळ्या ,झिंगे आणि खेकळे मिळतात.येथिल नदीपात्रात मासेमारी करून अनेक कुटूंब उदर्निवाह करीत असतात.या नदी पात्रात तंबू,घोगूर या सारख्या दुर्मिळ प्रजातीचा मासोळ्या सापडत असतात.बाजारात यांना मोठी मागणी आहे. सामान्य मासोळी पेक्षा यांचे भाव दुप्पट असते. अनेक वर्षानंतर अतिदुर्मिळ समजली जाणारी बोद मासोळी प्रथमच सकमुर घाटावर सापडली आहे. ही मासोळी समुद्र आणि डॕम सापडत असते. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेली बोद मासोळी दोनशे किलो वजनाची होती. ही मासोळी प्रथमच गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर घाटात सापडली आहे. ही मासोळी सापडल्याने मासेमारी करणाऱ्यात आनंद बघायला मिळाला. या मासोळीला बाजारात मोठी मागणी असून चारशे ते सहाशे रूपये भाव मिळत असतो. सकमुर घाटावर सापडलेल्या बोद मासोळीचे वजन दोन किलोचे होते.
(निलेश झाडे / धाबा)
#Chandrapur #Fish #Rearfishe #Sakalnews #Sakalmedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.