गेली सहा महिने कधी न पाहिलेल्या लॉकडाऊनला आपण सारे सामोरे जात आहोत. दरम्यानच्या काळात नवनवीन अनुभव घेत या परिस्थितीमध्ये मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी कलात्मक सृजनशीलता मोलाची ठरते. याच सृजनात्मकतेला जाणून औरंगाबाद येथे अभिजात कलेचे शिक्षण घेणारी उत्तूर गावातील (जि. कोल्हापूर) प्रतिक्षा व्हनबट्टे हीने कला कौशल्य मिश्रित 'फॅब्रिक ज्वेलरी' या संकल्पनेला आकार दिला.