पातुर्डा (जि.बुलडाणा) : जम्मू काश्मिरच्या बारामुल्ला सेक्टर मधील सोपोरा येथे (ता.18) दहशतवादी हल्ल्यात संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील सीआरपीएफचे जवान चंद्रकांत भाकरे हे शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवार (ता.20) त्यांच्या मुळगावी पातुर्डा येथे अंतिम संस्कार करण्यात आले. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे सोशल डिस्टन्स ठेऊन नागरिकांनी उपस्थिती लावत साश्रुनयनांनी वीरपुत्राला अखेरचा निरोप दिला.
#buldhana #shahid #vidarbha #sakal #liveupdates #marathinews #शहिद #viral #chandrakantbhakre