तब्बल पंचवीस वर्षे विद्यार्थी वाहतूक केल्यामुळे शिवाजी पंदारे नव्हे तर "रिक्षा मामा' म्हणूनच त्यांची ओळख निर्माण झाली. आठवड्यापूर्वीच हेच रिक्षामामा आता "चिकनवाले मामा' बनले आहेत. कोरोनाकाळात चार महिने शाळा बंद राहिल्या पर्यायाने रिक्षा बंद राहिल्या. आज उद्या शाळा सुरू होतील म्हणून आशेवर राहिले. अखेर त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट गाडीवर "चिकन 65 फाय'ची विक्री सुरू केली. रिक्षा चालवितानाचा त्यांचा जो उत्साह होता तोच आताही "चिकन 65'च्या गाडीवर दिसून येतो. "काय करायचे किती दिवस वाट पहायची, आता रिक्षा मामा नव्हे चिकनवाले मामा झालोय' अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रीया दिली.