एक गाव दगडांचे! कुठे आहे हे गाव? आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 120

धाबा (जि. चंद्रपूर) : गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या किरमीरी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील ९५ टक्के घरे दगडांनी बांधले आहेत. गावाला लागूनच असलेल्या डोंगरात घिसी गोटा मोठ्या प्रमाणात सापडतो. जेव्हा स्लॕबच्या घराची फॕशन नव्हती तेव्हा येथील दगडांना मोठी मागणी होती. धाबा परिसरातील बहुतांश घरांचा पाया किरमीरी येथील दगडांनीच भरलेला आहे. घर बांधकामासाठी येथील दगड फेमस होता. त्याप्रमाणेच किरमीरीतील पाण्याचे टाके प्रसिद्ध होते. येथे तयार होणाऱ्या दगडी पाण्याचा टाक्याला मोठी मागणी होती. बैलबंडीने टाके ग्राहकापर्यंत पोहोचविले जायचे. किरमीरीत जवळपास ३५० ते ४०० घरे आहेत. ही घरे दगडांनीच बांधलेली आहेत. गाव दगडामुळे लोकप्रिय झाले असले तरी येथील माणसे मात्र गोड स्वभावाची आहेत. (व्हिडिओ - नीलेश झाडे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS