कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढायला लागली आहे. सोमवारी (17) दुपारी साडेबारा वाजता आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी 34 फुटांवर गेली. ती रात्री उशीरापर्यंत 40 फुटांवर पोहचेल, असा प्राथमिक अंदाज आहे. कृष्णाकाठच्या भागातील घरांतून तातडीने स्थलांतर करण्याची सूचना महापालिकेने केली असून नागरिकांनी साहित्य बांधायला सुरवात केली आहे.
बातमीदार : अजित झळके
व्हिडिओ : शैलेश पेटकर