पुणे बंगळूर महामार्गावरील रस्त्याची पुन्हा दूरावस्था झाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सातारा शहरानजीकच्या खिंडवाडी ते शेंद्रे या रस्त्यावर आज (शुक्रवार) सकाळी सातारा पाेलिस दलातील पाेलिस कर्मचारी चक्क रस्त्यावरील खड्डे बुजविताना आढळले. दैनिक सकाळचे वाचक सागर भाेसले यांनी संबंधितांचे थांबून काैतुक केले. खरं तर तुमचे खड्डे बुजविण्याचे काम नाही परंतु तुम्ही हे करीत आहात तुम्हांला सलाम असे म्हणत भाेसले यांनी मनोज जाधव व किरण चिकणे या पाेलिस कर्मचारी यांनी सॅल्युट ठाेकला.
Video : Sagar Bhosale
Sakal #SakalMedia #SakalNews #Viral #ViralNews #Marathi #MarathiNews #Maharashtra #Satara #Pune #Banglore #NH4 #MaharashtraPolice #Police #Potholes #Trending #TrendingVideo