राजुरा (जि. चंद्रपूर) : जिल्ह्यातील वर्धा नदीवरील पूल हा वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय धोकादायक स्थितीत आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर चंद्रपूर व दक्षिण भारताला जोडणारा हा पूल वर्धा नदीवर अंदाजे 1960 ते 1965 च्या दरम्यान बांधण्यात आला. तब्बल 55 ते 60 वर्षांनंतरही या नदीवर नवीन पूल तयार झालेला नाही. दक्षिण भारताला जोडणारा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. अंदाजे पाचशे मीटर लांबीच्या या पुलावर कठळे नाही. शिवाय रिफ्लेक्टर नाहीत. त्यामुळे वर्धा नदीच्या पुलावरून रात्रीचा प्रवास अतिशय धोकादायक ठरत आहे. यामुळे वर्धा नदीवरून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. याकडे शासनाने व संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
(व्हिडिओ : आनंद चलाख-श्रीकृष्ण गोरे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.