मंगलादेवी (जि. यवतमाळ) : नेर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मिलमिली नदीला पूर आला. पुरामुळे नदीलगत असलेल्या शेकडो एकर शेतामध्ये पाणी शिरले. पावसामुळे पिके पूर्णत: खरडून गेली. आधीच दुबार पेरणी, बोगस बियाणे या सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी आता अस्मानी संकटामुळे पूर्णता बेहाल झालेला आहे. (व्हिडिओ : योगेश दहेकर)