ऑर्किडस वनस्पतीला स्वच्छ हवेची फुफ्फुसे असे म्हणतात. ज्या झाडांवर ही ऑकिॅडस् मोठ्या प्रमाणात असतात. त्या भागातील, परिसरातील हवा ही स्वच्छ असते. हवेतील घातक प्रदुषके, जसे की, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोक्सॉईड अशी प्रदुषके जिथे कमी असतात. तिथे हा ऑर्किडस् तरारुन येतो; पण जिथे सर्वाधिक प्रदुषके असतात, तिथे ऑर्किडस् उगवत नाहीत. तुलनेने कोल्हापूर शहरातील हवेचे प्रदुषण कमी आहे. अशा ठिकाणी ही ऑर्किडस् अनेक ठिकाणी झाडांवर दिसतात. रेन ट्री, आंबा अशा जाड साल असलेल्या झाडांवर ते उगवतात. ऑर्किडस्ला निळी फुले येतात. या फुलांपासून बुके तयार करता येतो. ऑर्किडस्ची शेती ही केली जाते. यातून उत्कृष्ठ अर्थकारणाला गती ही येते.
रिपोर्टर आणि व्हिडीओ जर्नलिस्ट : अमोल सावंत, सकाळ, कोल्हापूर
#sakal #news #viral #sakalnews #marathinews #kolhapur #arekids #tree #pollution #carbon dioxide #carbonmonoxide #city #raintree #mangotree #blueflower