"गणपती बाप्पा मोरया', "बाजी', जीवलगा यासारख्या विविध मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारा नाशिककरांचा आवडता कलावंत म्हणजे किरण भालेराव. त्याने साकारलेली "नंदी'ची भूमिका आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे चित्रीकरणही बंद आहे. या काळात किरण दररोज आपल्या घराच्या गच्चीवर व्यायाम करत आहे. प्रत्येकाने घरातच राहून व्यायाम करावा, असा संदेशही त्याने दिला आहे.